मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांना धमकी

मुंबई पोलिसांना कंट्रोल रुममध्ये धमकीचा कॉल आला. मुख्य न्यायमूर्तींच्या चेंबर बाजूच्या रुममध्ये बॉम्ब ठेवला असून थोड्याच वेळात स्फोट घडवला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती.

Mumbai High Court’s chief justice Manjula Chellur receives threat

A

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनतंर हायकोर्ट परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांना कंट्रोल रुममध्ये धमकीचा कॉल आला. मुख्य न्यायमूर्तींच्या चेंबर बाजूच्या रुममध्ये बॉम्ब ठेवला असून थोड्याच वेळात स्फोट घडवला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनंतर हायकोर्ट परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली.

शिवाय न्यायमूर्तींच्या दालनात बॉम्ब शोध पथक, श्वान पथक तिथे दाखल झालं. यानंतर दुसऱ्या मजल्यावरील मंजुला चेल्लूर यांच्या कोर्टरुमसह शेजारील खोलीचीही तपासणी केली.

परंतु तपासणीत बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. मात्र पूर्ण तपासणीनंतर मंजुला चेल्लूर यांना कोर्टरुममध्ये पाठवलं जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ही धमकी कोणी दिली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोण आहेत मंजुला चेल्लूर?
– 1955 साली कर्नाटकातील बेल्लारी गावात मंजुला चेल्लूर यांचा जन्म
– 1977 साली कायदा विषयात पदवी संपादित
– 1978 मध्ये कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये वकील म्हणून करिअरची सुरुवात
– 1988 मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून काम
– 2000 मध्ये कर्नाटकमध्ये पहिल्या महिला न्यायमूर्ती
– मुंबई हायकोर्टाच्या 154 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्या महिला न्यायमूर्ती होण्याचा मान
– याआधी 2014 मध्ये त्यांनी कोलकाता हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती म्हणून धुरा सांभाळली

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai High Court’s chief justice Manjula Chellur receives threat
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!
महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर

उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलणार का?
उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलणार का?

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी

मुंबई मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंची एसीबीकडे तक्रार
मुंबई मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंची एसीबीकडे तक्रार

मुंबई : मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत

दाऊदच्या सहा मालमत्तांचा केंद्राकडून लिलाव होणार
दाऊदच्या सहा मालमत्तांचा केंद्राकडून लिलाव होणार

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास

म्हाडा लॉटरी: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
म्हाडा लॉटरी: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई: म्हाडाने घरांच्या लॉटरीचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

मुंबईत लोकलच्या धडकेत गँगस्टरच्या मुलाचा मृत्यू
मुंबईत लोकलच्या धडकेत गँगस्टरच्या मुलाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील शिवडी रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या अंडरवर्ल्ड

एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच
एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री

ST संपाविरोधात हायकोर्टात 2  याचिका, एकाच दिवशी सुनावणी
ST संपाविरोधात हायकोर्टात 2 याचिका, एकाच दिवशी सुनावणी

मुंबई : एससटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संपाला आता दोन

बोनसचा तिढा सुटला, बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे
बोनसचा तिढा सुटला, बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला आहे. बेस्ट

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!
कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून