शंभर जणांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या 'त्या' दोघींना शोधा : कोर्ट

By: | Last Updated: > Thursday, 16 March 2017 11:54 AM
शंभर जणांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या 'त्या' दोघींना शोधा : कोर्ट

मुंबई : पुण्यात शंभर जणांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा करणाऱ्या नेपाळी तरुणीसह दिल्लीच्या मॉडेलला शोधा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना दिले आहेत. दिल्लीच्या 24 वर्षीय मॉडेलसह 16 वर्षीय नेपाळी तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचं सांगत वेश्याव्यवसायात जबरदस्ती ढकलल्याचा आरोप केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांसह शंभर जणांनी आपला लैंगिक छळ केल्याचा दावा नेपाळी तरुणीने केला आहे. ‘हे आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे असून पीडितांच्या ठावठिकाण्याबाबत आपल्याला काळजी वाटते. त्यामुळे त्यांना शोधण्याचे गांभीर्याने प्रयत्न करा.’ असं जस्टिस रणजित मोरे आणि रेवते डेरे यांच्या खंडपीठाने सांगितलं.

गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही पीडिता बेपत्ता असल्याने ही केस सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने पुणे पोलिसांना दोघींचा शोध घेण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पोलिसांवर आरोप केलेले असल्यामुळे दोघींच्या जीवाचं बरं-वाईट झाल्याची भीतीही वकिलांनी व्यक्त केली.

या प्रकरणात ज्या दोघा पोलिसांवर आरोप आहेत, तेच कोर्टात प्रॉसिक्युटरला मार्गदर्शन करत असल्यामुळे कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

काय आहे प्रकरण?

मार्च 2016 मध्ये दिल्लीच्या संबंधित मॉडेलला भाजल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी, रोहित भंडारी नावाच्या व्यक्तीने आपल्याला चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मात्र आपण नकार देताच सिगरेटचे चटके देऊन बलात्कार केला. त्यानंतर अनेक आरोपींनी आपल्यावर गँगरेप केल्याचा आरोप तिने केला होता.

रोहितच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये मॉडेलची ओळख 16 वर्षीय नेपाळी तरुणीशी झाली. तिला ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने नेपाळहून पुण्याला आणण्यात आलं होतं. 2014 पासून दोन वर्ष अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरु, भोपाळमधील अनेक जणांनी रेप केल्याचं नेपाळी तरुणीने सांगितलं. त्यानंतर दोघींनी यशस्वीपणे दिल्लीला पलायन केलं.

First Published:

Related Stories

खासदार राजू शेट्टींचा मुलगा सौरभही राजभवनावर धडकणार
खासदार राजू शेट्टींचा मुलगा सौरभही राजभवनावर धडकणार

नवी मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी

शेतकऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची भाजप नेत्यांची लायकी नाही : शेट्टी
शेतकऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची भाजप नेत्यांची लायकी नाही :...

नवी मुंबई : भाजपकडून शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा सुरु केली असताना

नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी भुजबळांचं सरकारला तुरुंगातून पत्र
नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी भुजबळांचं सरकारला तुरुंगातून पत्र

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तुरुंगातूनच

दंडवसूली घटली, मुंबई पोलिसांचा ई-चलानचा प्रयोग फसला
दंडवसूली घटली, मुंबई पोलिसांचा ई-चलानचा प्रयोग फसला

मुंबई : कॅशलेस होण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी वाहतूक नियम

बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार!
बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार!

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या

आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या पायांना सूज आणि फोड!
आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या पायांना सूज आणि फोड!

नवी मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/05/2017

1. पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत कमळ फुललं, भाजपला स्पष्ट

भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल 2017
भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल 2017

भिवंडी : भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसनं पुन्हा एकदा काबिज

धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा होणार
धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा होणार

मुंबई : धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको

काँग्रेसचे दिवगंत नेते मनोज म्हात्रेंच्या पत्नी अवघ्या 150 मतांनी विजयी
काँग्रेसचे दिवगंत नेते मनोज म्हात्रेंच्या पत्नी अवघ्या 150 मतांनी...

भिवंडी: भिवंडीतील काँग्रेसचे दिवंगत नेते मनोज म्हात्रे यांच्या