एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं : हायकोर्ट

मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं.

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं : हायकोर्ट

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं आहे.

एल्फिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं.

डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना कपाळावर स्केचपेननं नंबर टाकल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने दिली. जाब विचारणाऱ्या नातेवाईकांवर पोलिसांकडून केसेस दाखल होणं धक्कादायक असल्याचंही मुंबई हायकोर्टाने सांगितलं.

भविष्यात अश्याप्रकारची घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा अजून सक्षम करण्याची गरजही कोर्टाने व्यक्त केली.

आरटीआय कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. केंद्र सरकार, रेल्वेसह इतर प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होत.

29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांना प्राण गमवावे लागले होते, तर अनेक जण जखमी झाले होते.

संबंधित बातम्या :


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: पोलिसांनी कारण शोधलं, निष्कर्ष काढला!


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी म्हणजे घातपात, जनहित याचिकेत दावा


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : महिलेच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडले


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : ... तर ही दुर्घटना टाळता आली असती!


चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्तुत्य उपक्रम


मुंबईकरांनो, मयुरेशसाठी 'इथला' एक तरी वडा-पाव विकत घ्या!


एलफिन्स्टन दुर्घटना : हळदणकर कुटुंबियांना शिवसेना आमदाराकडून मदत.


 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai Highcourt slams Government over Elphinston Stampede latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV