स्टेशन, थिएटर, ट्रेन.. मुंबईत विनयभंगांच्या घटनांत वाढ

मुंबईत रेल्वे स्थानकांवर विनयभंगाच्या घटना घडल्यानंतर आता अभिनेत्रीही सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत मद्यधुंद व्यक्तीनं विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

स्टेशन, थिएटर, ट्रेन.. मुंबईत विनयभंगांच्या घटनांत वाढ

मुंबई : मुंबईत रेल्वे स्थानकांवर विनयभंगाच्या घटना घडल्यानंतर आता अभिनेत्रीही सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत मद्यधुंद व्यक्तीनं विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

29 जून.... सीएसटी स्थानकावर तरुणाचे हस्तमैथुन

8 जुलै.... चर्चगेट स्थानकावर तरुणीचा विनयभंग

16 जुलै.... प्रिया बेर्डेंचा चित्रपटगृहात विनयभंग

गेल्या काही दिवसातल्या या घटनांनी महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. आतापर्यंत सामान्य महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या या घटना आता सेलिब्रिटींच्या बाबतीतही घडू लागल्या आहेत. मिरा रोडमधल्या एका चित्रपटगृहात अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा विनयभंग झाला.

चर्चगेट स्टेशनवर तरुणीचा विनयभंग


प्रिया बेर्डे यांनी हिंमत करुन त्यांचा विनयभंग करणाऱ्या सुनील जानीच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलिसांच्या हवाली केलं. पण प्रत्येक महिलेला हे धाडस शक्य होतंच असं नाही. बऱ्याचदा नस्ती कटकट नको, म्हणून अनेक महिला गप्प राहतात.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा थिएटरमध्ये विनयभंग


आतापर्यंत झालेल्या तिन्ही घटनांमध्ये महिलांनी धाडस करुन घटनेला वाचा फोडली. हीच जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे.

सीएसटीवर तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणारा अखेर अटकेत


प्रतिकार करण्याची ताकद महिलांमध्ये आहे. फक्त अशा घटनांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आणि समाजाने त्या प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV