पल्लवी पूरकायस्थच्या फरार मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या

काश्मिरातील पाकिस्तानच्या सीमेजवळ उरीमध्ये सज्जादचं गाव आहे. वर्षभरापासून पोलिस सज्जादचा शोध घेत होते.

पल्लवी पूरकायस्थच्या फरार मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या

मुंबई : मुंबईतील वकील तरुणी पल्लवी पूरकायस्थच्या हत्या प्रकरणातील फरार मारेकरीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचने श्रीनगरमध्ये कारवाई करुन दोषी सज्जाद मुगलला बेड्या ठोकल्या. जवळपास गेल्या दीड वर्षांपासून सज्जाद फरार होता.

पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांचं अभिनंदन केलं. नाशिकच्या जेलमध्ये असताना फेब्रुवारी 2016 मध्ये सज्जादला पॅरोल मिळाला होता. आईच्या आजारपणाचं कारण पुढे करुन सज्जादने पॅरोल मिळवला.

स्थानिक पोलिस स्टेशनला हजेरी लावण्याची अट त्याला घालण्यात आली होती. त्याचा पॅरोल मार्चमध्ये संपणार होता, मात्र त्याने तो वाढवून घेतला. त्यानंतर सज्जाद परागंदा झाला. मेमध्येही तो परत न आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल केली.

काश्मिरातील पाकिस्तानच्या सीमेजवळ उरीमध्ये सज्जादचं गाव आहे. वर्षभरापासून पोलिस सज्जादचा शोध घेत होते. अखेर जम्मू काश्मिर पोलिसांच्या सहकार्याने मंगळवारी श्रीनगर-लेह हायवेवर पोलिसांनी मुगलला अटक केली.

25 वर्षीय पल्लवी तिचा भावी जोडीदार अविक सेनगुप्तासोबत 16 व्या मजल्यावर राहत होती. 9 ऑगस्ट 2012 रोजी पल्लवीला तिच्या इमारतीचा सुरक्षारक्षक सज्जाद मुगलने जीवे मारलं होतं. मुंबईतल्या वडाळ्यामधील तिच्या राहत्या घरी रात्रीच्या वेळीत घुसून पल्लवीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र पल्लवीने केलेल्या विरोधामुळे त्याने तिची हत्या केली.

2014 मध्ये सेशन्स कोर्टाने सज्जादला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सज्जाद फरार झाल्यानंतर फडणवीसांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पॅरोल न देण्याची शिफारस केली. पॅरोलचे दिवस 90 वरुन 46 वर आणण्यात आले.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV