मुंबईत मुलुंडमध्ये शिरलेला बिबट्या सहा तासांनी जेरबंद

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही ट्वीट करुन बिबट्या शिरल्याची माहिती दिली होती.

मुंबईत मुलुंडमध्ये शिरलेला बिबट्या सहा तासांनी जेरबंद

मुंबई : मुंबईतील मुलुंड भागातील रहिवासी शनिवारी सकाळपासून बिबट्याच्या दहशतीत वावरत होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतरही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. बिबट्याने सहा जणांना जखमी केल्याची माहिती आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुलुंड पूर्वेच्या नानेपाड्यात बिबट्या शिरला होता. काही तास उलटल्यानंतरही बिबट्याला जेरबंद करता आलं नव्हतं.अखेर, बेशुद्धीचं इंजेक्शन मारुन बिबट्याला पकडण्यात आलं.

बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

mulund

नानेपाडा भागातीलच एका इमारतीत बिबट्या लपला होता. वन विभागाचे कर्मचारी तीन तास बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करत होते. अखेर साडेअकरा नंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही ट्वीट करुन बिबट्या शिरल्याची माहिती दिली होती. तसंच जखमींचे फोटो शेअर केले होते.

 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Leopard in Mulund’s Nanepada latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV