मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

अभियांत्रिकी कामांसाठी रविवार, 15 एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई : अभियांत्रिकी कामांसाठी रविवार, 15 एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने, रविवारी सकाळी 10.48 ते दुपारी 4.14 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या सर्व धिम्या, अर्धजलद लोकल फेऱ्या, कल्याण ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तसेच, सकाळी 10.05 ते दुपारी 2.54 दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या लोकल आणि सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल बंद असणार आहेत.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने, रविवारी दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mumbai local megablock on 15th april 2018 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV