मुंबईच्या कांदिवलीत दुमजली इमारतीला भीषण आग

आगीत चार ते पाच दुकानं जळून खाक झाली आहेत. तर अडकलेल्या काही लोकांना शिडीद्वारे सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

मुंबईच्या कांदिवलीत दुमजली इमारतीला भीषण आग

मुंबई : मुंबईच्या कांदिवलीत अशोकनगरमध्ये एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, सात पाण्याचे टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे.

अशोकनगरमध्ये इंडस्ट्रियल इस्टेट आहे. तिथे दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दुकान आणि गोदामाला आज सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी आग लागली.

आगीत चार ते पाच दुकानं जळून खाक झाली आहेत. तर अडकलेल्या काही लोकांना शिडीद्वारे सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV