VIDEO : मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना तरुण लोकलखाली

मुस्तफा इद्रीस शेख नावाचा तरुण रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात होता. मात्र दुसऱ्या बाजूने येत असलेल्या लोकलकडे त्याचं लक्ष गेलं नाही.

VIDEO : मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना तरुण लोकलखाली

मुंबई : मुंबईतील मस्जिद रेल्वे स्थानकावर लोकलखाली आलेल्या तरुणाचे प्राण ड्यूटीवर असणाऱ्या आरपीएफ जवानाने वाचवले. ही घटना स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मुस्तफा इद्रीस शेख नावाचा तरुण रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात होता. मात्र दुसऱ्या बाजूने येत असलेल्या लोकलकडे त्याचं लक्ष गेलं नाही. त्यावेळी लोकलच्या धडकेत तो खाली पडला.

लोकल थांबली तेव्हा आरपीएफ जवान नितीन अवसरमल यांनी मुस्तफाला बाहेर काढलं. त्याच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत.

पाहा व्हिडिओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Masjid Bunder railway station accident caught in CCTV latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV