वादग्रस्त हॉकर्स झोन रद्द, राज, राणेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार नाहीत!

जुन्या फेरीवाला धोरणानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या घरासमोर हॉकर्स झोन तयार करण्यात आला होता.

वादग्रस्त हॉकर्स झोन रद्द, राज, राणेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार नाहीत!

मुंबई: मोठ्या वादानंतर अखेर मुंबईतल्या हॉकर्स झोनची यादी मुंबई महापालिकेला बासनात गुंडाळावी लागली आहे. हॉकर्स झोनची यादी रद्द करुन नवीन नियोजन करा आणि नवी यादी तयार करा असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जुन्या फेरीवाला धोरणानुसार मनसे अध्यक्ष राज  ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या घरासमोर हॉकर्स झोन तयार करण्यात आला होता.

मुंबई महापालिकेनं मुद्दाम राज यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोप मनसेनं केला होता. तर आमच्या घरासमोर फेरीवाले बसवून दाखवा, मग ‘मातोश्री’बाहेर कसे फेरीवाले उभे करायचे हे आम्हाला चांगलं माहित आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं.

“नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या प्रभागाची माहिती असते. कोणत्या रस्त्यांना जास्त वाहतूक, ट्रॅफिक असते हे माहित आहे. पण स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता, अधिकाऱ्यांनी हॉकर्स झोन तयार केले. मात्र या मनमानी यादीविरोधात सर्वांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ही यादी रद्द केली”, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.नेमकं प्रकरण काय?

मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार केले. यामध्ये दिग्गज सेलिब्रेटींच्या घराबाहेर फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण देण्याचा प्रस्ताव होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासाप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे, अभिनेता आमीर खान आणि संजय दत्त यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना महापालिकेने जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला. पण उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली. यावरुन मनसे आणि नितेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेतला.

मात्र आता हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.

कुठे कुठे फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित होत्या?

मुंबई महापालिकेकडून 1366 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून प्रस्तावित

85 हजार 891 फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित

फेरीवाला क्षेत्रासाठी 10 फुटांचा फूटपाथ आवश्यक

शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयांपासून 100 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही

रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही

अभिनेता आमीर खानचं निवासस्थान असलेल्या हिल रोड 12वा रस्ता, या ठिकाणी 10 फेरीवाल्यांसाठी जागा

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेंच्या जुहूतील तारा रोड परिसरात घराबाहेर 36 फेरीवाले प्रस्तावित

अभिनेता संजय दत्तचे निवासस्थान असलेल्या पाली हिल रस्त्यावर 10 फेरीवाल्यांसाठी जागा

'कृष्णकुंज'बाहेरील दोन रस्त्यांवर प्रत्येकी 10 असे 20 फेरीवाले प्रस्तावित

'राजगड'बाहेरील रस्त्यावर 200 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित

दादरमध्ये नियमानुसार अत्यंत तुरळक फेरीवाल्यांना जागा प्रस्तावित

दादर-धारावीमधील जी नॉर्थ विभागात 4 हजार 455 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये

संबंधित बातम्या

...तर ‘मातोश्री’समोरही फेरीवाले उभे करु : नितेश राणे

राज ठाकरे, आमीरच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी

मनसेच्या ‘कृष्णकुंज’वरील बैठकीत नेमकं काय ठरलं?

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’बाहेरच फेरीवाले बसणार?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Mayor has cancelled hawkers zone list update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV