मुंबई मेट्रो- 5 आणि 6 ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई मेट्रो 5 आणि 6 या प्रकल्पांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली गेली.

मुंबई मेट्रो- 5 आणि 6 ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले.  मुंबई मेट्रो 5 आणि 6 या प्रकल्पांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली गेली.

मेट्रो- 5 हा प्रकल्प ठाणे-भिवंडी ते कल्याण असा असेल. एकूण २४ किलोमीटर इतकं हे अंतर असणार आहे. तर मेट्रो- ६ चं अंतर हे 14.47 इतकं आहे.

मेट्रो- ६ चा मार्ग लोखंडवाला स्वामी समर्थ सर्कल ते कांजूरमार्ग असा असणार आहे. प्रकल्पाला एकूण ६ हजार ६७२ कोटी इतका खर्च आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत एकूण १३ स्थानकं या मार्गावर नियोजित करण्यात आली आहेत.

"गेल्या काही वर्ष मुंबईच्या हिताचे निर्णय होत नव्हते. त्यामुळं मुंबईच्या विकासाची गाडी 100 किलोमीटर वेगाने धावत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडलाच्या बैठकीत मेट्रो 5 आणि 6 ला परवानगी मिळाली. मुंबईवर विशेष लक्ष देण्यासाठी सरकारने हे प्रयत्न केले आहेत. 2021-22 पर्यंत इथले प्रश्न मार्गी लागावेत हा सरकारचा हेतू आहे," अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

यासोबतच सरपंचापाठोपाठ आता नगरपंचायत अध्यक्षाचीही निवड थेट जनतेमार्फत करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

संबंधित बातम्या

सरपंच आणि नगराध्यक्षापाठोपाठ आता नगरपंचायत अध्यक्षही थेट जनतेतून

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV