यापुढे मेट्रोच्या तिकीटासाठी रांग लावण्याची गरज नाही!

यापुढे मेट्रो प्रवाशांना तिकीटासाठी रांग लावण्याची गरज राहणार नाही. कारण पेटीएम आणि रिडलर या अॅपच्या माध्यमातून मेट्रोचं तिकीट अथवा पासचं रिचार्ज करता येणार आहे.

यापुढे मेट्रोच्या तिकीटासाठी रांग लावण्याची गरज नाही!

मुंबई : मुंबई मेट्रोनं आपल्या प्रवाशांसाठी आणखी एक 'स्मार्ट पाऊल' उचललं आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांचा वेळही आणखी वाचणार आहे.

यापुढे मेट्रो प्रवाशांना तिकीटासाठी रांग लावण्याची गरज राहणार नाही. कारण पेटीएम आणि रिडलर (Paytm and Ridlr) या अॅपच्या माध्यमातून मेट्रोचं तिकीट अथवा पासचं रिचार्ज करता येणार आहे. या दोन्ही अॅपवर मेट्रोनं SKiiipQ हे  फीचर लाँच केलं आहे. त्यामुळे तिकीटासाठी रांग लावण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.या अॅपमधून तिकीट काढल्यानंतर स्टेशनवर जाण्याआधी आणि स्टेशनवरुन बाहेर पडण्याआधी प्रवाशांना फक्त अॅपमधील तिकीटाचा कोड मशीनवर  स्कॅन करावा लागेल.

मुंबई मेट्रोनं आजपासून पेटीएम आणि रिडलरच्या साथीनं ही सुविधा सुरु केली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai metro launch skiiip q for tickets and passes latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV