बोनससाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी संघटना एकवटल्या

एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनस नसेल तर चालेल पण पगार वेळेवर द्या असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या तब्बल 40 संघटना बोनसच्या मागणीसाठी एकवटल्या आहेत.

बोनससाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी संघटना एकवटल्या

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर मुंबई महापालिकेतील कर्मचारी संघटना सानुग्रह अनुदानासाठी आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना यंदा 40 हजारांचा दिवाळी बोनस देण्यात यावा अशी मागणी पालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे.

एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनस नसेल तर चालेल पण पगार वेळेवर द्या असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या तब्बल 40 संघटना बोनसच्या मागणीसाठी एकवटल्या आहेत.

दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी पालिकेच्या तिजोरीवर 300 कोटींचा भार पडणार आहे. 5 तारखेला महापालिका कर्मचाऱ्यांच्या 40 संघटना आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन पुकारणार आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV