नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचं 'गजनी'रुपातील रेखाचित्र

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव यांचं रेखाचित्र रेखाटून त्यांची तुलना 'गजनी' चित्रपटातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी केली आहे.

नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचं 'गजनी'रुपातील रेखाचित्र

मुंबई : काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव यांचं रेखाचित्र रेखाटून त्यांची तुलना 'गजनी' चित्रपटातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी केली आहे.

उद्धव ठाकरे यांचं अर्कचित्र काढून शरीरावर विविध गोष्टी लिहिल्या आहेत. ज्याप्रमाणे 'गजनी' चित्रपटातील आमीर खानने साकारलेली संजय सिंघानिया ही व्यक्तिरेखा अनेक गोष्टी विसरत असल्यामुळे शरीरावर लिहून ठेवते, त्याप्रमाणे अर्कचित्रात उद्धव यांच्या शरीरावर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत.

'भाजप आमचा मित्र पक्ष आहे', 'शिवसेना सत्तेत आहे', 'मी सत्तेत आहे', 'एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध' अशा काही गोष्टी रेखाटल्या आहेत. यावर शिवसेना काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/886249321255112709

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV