13 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची प्रेग्नंट, गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात

थायरॉईडमुळे लेकीचं वजन वाढत असल्याचं संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं.

By: | Last Updated: > Friday, 11 August 2017 12:24 PM
Mumbai : Parents seek doctor for obesity of 13 year old daughter, found her pregnancy for 27 weeks latest update

प्रातिनिधीक फोटो

मुंबई : 13 वर्षांच्या मुलीचं वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आई-बाबा तिला चेकअपसाठी दवाखान्यात घेऊन गेले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या चारकोप परिसरात घडला आहे. पालकांनी मुलीला तपासणीसाठी दवाखान्यात नेलं. थायरॉईडमुळे लेकीचं वजन वाढत असल्याचं संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं.

मुलीला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसात तक्रार केल्यावर अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरवर्षी 15 वर्षांखालील 200 हून अधिक मुलींचे गर्भपात केले जातात. मात्र गर्भ 20 आठवड्यांच्या आतील असेल तरच गर्भपाताला परवानगी आहे. परंतु पीडित मुलगी ही 27 आठवडयांची प्रेग्नंट असल्यानं तिच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

मुलीच्या गर्भपातासाठी तिचे पालक डॉक्टरांच्या मदतीने सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : Parents seek doctor for obesity of 13 year old daughter, found her pregnancy for 27 weeks latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान
मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रॅकशेजारी मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय

कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर
कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर

मुंबई : सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन

भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर
भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर

मुंबई : शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/08/2017   शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका!

कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी शिक्षणाचा स्वप्नभंग
कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी...

मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता

वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता
वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी...

नवी मुंबई : नवी मुंबईमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ

कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर चव्हाणांचं उत्तर
कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर...

मुंबई : “काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.

कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   
कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   

डोंबिवली : डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेची हत्या

मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई
मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई

घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास
घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास

मुंबई: घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डरला सहा