अँकर अर्पिता तिवारी हत्येप्रकरणी मित्राला अटक

'अर्पिताचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचा बॉयफ्रेण्ड, तीन मित्र आणि घरकाम करणारी व्यक्ती उपस्थित होते. मग फक्त अमित हजराला का अटक केली. या हत्येत इतरांचा सहभाग नाकारता येत नाही' असा संशय अर्पिताच्या मोठ्या बहिणीने व्यक्त केला आहे.

अँकर अर्पिता तिवारी हत्येप्रकरणी मित्राला अटक

मुंबई : 24 वर्षीय अँकर अर्पिता तिवारीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिच्या मित्राला अटक केली आहे. 28 वर्षीय अमित हजरा याला सोमवारी बेड्या ठोकण्यात आल्या. 11 डिसेंबर 2017 रोजी मालाडमधील उच्चभ्रू वसाहतीत अर्पिताचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळला होता.

परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही अटक केली आहे. कलिन्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये चारही संशयितांची पॉलिग्राफ टेस्ट केल्यानंतर अमितची उत्तरं असमाधानकारक आढळली. त्यामुळे त्याला बेड्या ठोकल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अमित हजरा मूळ झारखंडमधील धनबादचा असून मुंबईत एका अॅडव्हर्टायझिंग आणि फिल्म प्रॉडक्शन कंपनीत काम करतो. त्याला बोरीवली कोर्टात हजर केल्यानंतर 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईत अँकर तरुणीची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या


अर्पिताच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेण्डसह पाचही मित्रांवर आरोप केला होता. मालाडच्या मानवस्थळ इमारतीतील दुसऱ्या मजल्याच्या बांधावर अर्पिताचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. अर्पिताला 15 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून खाली ढकलल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता.

'अर्पिताचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचा बॉयफ्रेण्ड, तीन मित्र आणि घरकाम करणारी व्यक्ती उपस्थित होते. मग फक्त अमित हजराला का अटक केली. या हत्येत इतरांचा सहभाग नाकारता येत नाही' असा संशय अर्पिताच्या मोठ्या बहिणीने व्यक्त केला आहे.

अँकर तरुणीचा मृत्यू : अर्पिता तिवारीला पंधराव्या मजल्यावरुन ढकललं?


10 डिसेंबर म्हणजे अर्पिताच्या मृत्यूच्या आदल्या रात्री सर्व मित्र दोन रेस्ट्रोबारमध्ये गेले होते. त्यांनी एकत्र काही ड्रिंक्स घेतली. अर्पिता आणि तिचे मित्र मालाडमधील अपार्टमेंटमध्ये आले. तिथे त्यांचे कॉमन मित्र भाड्याच्या घरात राहत होते. दुसऱ्या दिवशी अर्पिताचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावर इमारतीच्या बाहेरच्या भागात अर्धनग्नावस्थेत लटकलेला होता.

फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यूच्या वेळी तिने मद्यप्राशन केलं होतं. सुरुवातीला मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र तिच्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. अज्ञातांविरोधात कलम 302 (हत्या) आणि कलम 201 (पुरावे नष्ट करणे) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचा दावा

पोलिसांच्या माहितीनुसार अर्पिताचे तिच्या बॉयफ्रेण्डसोबत वाद सुरु होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्राईम सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी आत्महत्या, चुकून कोसळणं आणि जाणीवपूर्व धक्का देऊन खाली पाडणं या सर्व शक्यतांवर विचार केला.

मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता, त्यामुळे संशयाला जागा आहे, असं तपास पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. मृत्यू झाला त्या दिवशी अँकरने मद्यपान केलं असलं तरी ती कपड्यांशिवाय उडी मारणार नाही. यासोबतच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चार जणांचे जबाबही परस्परविरोधी आहेत, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai Police arrested friend in connection with murder case of Anchor Arpita Tiwari latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV