काम देण्याच्या बहाण्याने तरुणींकडून देहव्यापार, मुंबईत सेक्स रॅकेट

मुंबईतील मालाडमधील बांगूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आणि दोन जणांना ताब्यात घेतलं.

काम देण्याच्या बहाण्याने तरुणींकडून देहव्यापार, मुंबईत सेक्स रॅकेट

मुंबई : मालिका आणि सिनेमांमध्ये काम मिळवून देतो असं म्हणत तरुणींकडून देहव्यापार करुन घेणाऱ्या रॅकेटचा मुंबईत पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील मालाडमधील बांगूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आणि दोन जणांना ताब्यात घेतलं.

दोघांपैकी एकाचं नाव महुल वाघेला आहे, जो टीव्ही मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करतो. सामाजिक कार्यकर्ते अमित जलान यांना या सेक्स रॅकेटची माहिती मिळताच त्यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती कळवली.

पोलिसांनी काल रात्री खोटे ग्राहक बनून मालाडमधील एका हॉटेलमध्ये या एजंट आणि मुलींना बोलावून घेतलं. यात दोन अल्पवयीन मुलींसह काही मॉडेलचा समावेश होता. पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत त्यांची किंमत केली जात होती.

पोलिसानी रंगेहात हे रॅकेट पकडून दोन अल्पवयीन मुलींसह एकूम पाच मुलींची सुटका केली. या प्रकरणात मालाडच्या बांगूर नगर पोलीस ठाण्यात पोस्को आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai police arrested two persons in Malad for sex racket
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV