कुर्ल्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कुर्ला नेहरुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कामगारनगरमध्ये एका रो हाऊसमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं.

कुर्ल्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई: एका उच्चभ्रू सोसायटीत चालणारं हायप्रोफाइल सेक्स रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं.

कुर्ला नेहरुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कामगारनगरमध्ये एका रो हाऊसमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. याबाबतची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना मिळाली.

यानुसार पोलिसांनी छापा मारुन तीन महिलांची सुटका केली, तर दोन महिलांना अटक केली. गेल्याअनेक महिन्यांपासून हे सेक्स रॅकेट चालू होतं.

हे रॅकेट चालविणाऱ्या आरोपी रेखा मोरे आणि अनिता चांदणे या महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mumbai police busted high profile sex racket in Kurla
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV