मुंबईत 'थर्टी फर्स्ट'साठी आणलेलं 3 किलो एमडी ड्रग्ज जप्त

मुंबईच्या अंधेरीतील आंबोली पोलिसांनी 3 किलो एमडी ड्रग्ज पकडलं.

मुंबईत 'थर्टी फर्स्ट'साठी आणलेलं 3 किलो एमडी ड्रग्ज जप्त

मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेलं 3 किलो एमडी ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. मुंबईच्या अंधेरीतील आंबोली पोलिसांनी 3 किलो एमडी ड्रग्ज पकडलं. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आलेल्या ड्रग्जवर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी पकडलेल्या या ड्रग्जची किंमत साधारण एक कोटींच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

मुंबईसह जगभरात थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनची धूम आहे. त्यातच असे प्रकारही समोर येत आहेत. या सेलिब्रेशनदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai police seized 3 kg MD drugs which were brought for new year celebration
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV