मुख्यमंत्र्यांना टमरेल देण्याचा प्रयत्न, राईट टू पी कार्यकर्त्या ताब्यात

कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी टमरेल आणि अस्वच्छ शौचालयांचे फोटो आणले होते.

मुख्यमंत्र्यांना टमरेल देण्याचा प्रयत्न, राईट टू पी कार्यकर्त्या ताब्यात

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेटायला गेलेल्या राईट टू पी च्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी टमरेल आणि अस्वच्छ शौचालयांचे फोटो आणले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या महिला कार्यकर्त्यांना भेट नाकारली. तरीही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा या महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलं.

मुंबईत महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, तरीही मुंबईला हगणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आलं आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हा मोर्चा छेडला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Right to pee activists held after attempt to give tumbrel to CM Devendra Fadanvis latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV