मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद

माघी गणेशोत्सवनिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे

मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद

मुंबई : मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे.  सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे.

माघी गणेशोत्सवनिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून (10 जानेवारी) 14 जानेवारीपर्यंत भाविकांना सिद्धीविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही.

परंतु, या कालावधीत भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येईल. त्यानंतर सोमवारी 15 जानेवारी रोजी गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, असंही आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Siddhivinayak Ganpati’s darshan will closed for five days
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV