प्रेयसीच्या आत्महत्येला जबाबदार ठरवलेल्या पोलिसपुत्राचा गळफास

'तरुणाच्या घरी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आम्ही अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला आहे' अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

प्रेयसीच्या आत्महत्येला जबाबदार ठरवलेल्या पोलिसपुत्राचा गळफास

मुंबई : मुंबईत हेड कॉन्स्टेबलच्या 25 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकावर कॉन्स्टेबल असलेल्या प्रेयसीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरुणाच्या गर्लफ्रेण्डने नोव्हेंबर महिन्यात आपलं आयुष्य संपवलं होतं.

रविवारी सकाळी राहत्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मुंबईतल्या परेल भागातील पोलिस हेडकॉर्टर्समध्ये राहत होता. एका खाजगी कंपनीत तो नोकरी करत होता. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

'तरुणाच्या घरी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आम्ही अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला आहे' अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

घटनेच्या वेळी तरुणाशिवाय कोणीही घरी नव्हतं. मुलाने बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे त्याच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.

28 नोव्हेंबर रोजी तरुणाच्या 22 वर्षीय गर्लफ्रेण्डने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे तरुण राहत असलेल्या पोलिस हेडकॉर्टर्समध्येच मयत कॉन्स्टेबल तरुणीही राहत होती. 2014 पासून ती पोलिस दलात कार्यरत होती.

गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र युवकाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तरुणीच्या बहिणीने संबंधित युवकाविरोधात भोईवाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : son of Head constable booked for girlfriend’s suicide, found hanging latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV