मुंबईत भरधाव टेम्पोने शाळकरी मुलांना उडवलं, विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेतून परतताना मार्वे रोडवरील जरीमरी मंदिराजवळ टेम्पोने त्यांना धडक दिली.

मुंबईत भरधाव टेम्पोने शाळकरी मुलांना उडवलं, विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई : मुंबईत भरधाव टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मालाड मालवणी परिसरातील मार्वे रोडवर ही दुर्दैवी घटना घडली.

मुस्कान मेमन असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती 13 वर्षांची होती. तर नेहा मेनाली (वय 13 वर्ष), भुपेंद्र मेनाली (वय 9 वर्ष) आणि कमल मेनाली (वय 12 वर्ष) असं जखमी विद्यार्थ्यांचं नाव आहे.

सर्व मुलं मालवणी परिसरातच राहत असून महापालिकेच्या शाळेत शिकतात. शाळेतून परतताना मार्वे रोडवरील जरीमरी मंदिराजवळ टेम्पोने त्यांना धडक दिली. यात मुस्कान मेमनचा मृत्यू झाला

या प्रकरणी मालवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Tempo rams into school kids, 1 dead 3 injured
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV