कारमध्ये महिला लेकराला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग

कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे महिला (त्याची पत्नी) आपल्या सात महिन्याच्या लेकराला दूध पाजत बसली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी बळजबरीनं ही कार टो करुन नेली.

कारमध्ये महिला लेकराला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग

मुंबई : मुंबईच्या वाहतूक शाखेचे पोलिस किती असंवेदनशील आहेत, याचं उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. महिला सात महिन्यांच्या मुलाला दूध पाजत असतानाही पोलिसांनी नो पार्किंगमधील कार टो करुन नेल्याची घटना समोर आली आहे.

मालाडमध्ये नो पार्किंग झोनमध्ये एक कार उभी करण्यात आली होती. कारमालक काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तर या कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे महिला (त्याची पत्नी) आपल्या सात महिन्याच्या लेकराला दूध पाजत बसली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी बळजबरीनं ही कार टो करुन नेली.

विशेष म्हणजे, हा व्हिडीओ काढणारा युवक वाहतूक पोलिसांना कार ओढून नेऊ नका, अशी विनंती करत आहे. कारमध्ये एक महिला बाळाला दूध पाजत आहे, म्हणून किमान गाडी सावकाश ओढा, असंही ओरडून सांगत आहे. मात्र त्याचं काहीएक ऐकता वाहतूक पोलिस कार ओढून नेत होते.

इतकंच नाही, तर महिला दंड भरण्यास तयार आहे, असंही तो सांगत आहे. शशांक राणे असं वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचं नाव असल्याचं युवक बोलताना व्हिडिओत ऐकू येत आहे. या प्रकरणी ट्रॅफिक कॉन्स्टेबल शशांक राणेला निलंबित करण्यात आलं आहे.

नो पार्किंगमध्ये कार उभी असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. मात्र कार टो करुन नेताना महिलेला उतरवण्याचं भान पोलिसांनी ठेवायला हवं. किंबहुना कारला जॅमर लावूनही पोलिसांना कारवाई करता आली असती, मात्र त्यांनी आडमुठेपणा केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Traffic Police tows car in Malad while woman giving milk to baby latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV