मुंबई विद्यापीठावर आता पुनर्मूल्यांकनाचं ओझं!

मुंबई विद्यापीठात निकालाचा सावळा गोंधळ संपलेला नसताना, आता पुनर्मूल्यांकनाचा भार येऊन पडला आहे. तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत.

मुंबई विद्यापीठावर आता पुनर्मूल्यांकनाचं ओझं!

मुंबई : मुंबई विद्यापीठात निकालाचा सावळा गोंधळ संपलेला नसताना, आता पुनर्मूल्यांकनाचा भार येऊन पडला आहे. तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. येत्या काळात पुनर्मूल्यांकनाच्या अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 हजार अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. एकीकडे काही निकाल अजून लागणं बाकी आहे. तर दुसरीकडे विद्यापीठावर पुनर्मूल्यांकनाचा अतिभार येऊन पडला आहे. विशेष म्हणजे, पुनर्मूल्यांकनासोबतच फोटोकॉपीसाठीही विद्यार्थी अर्ज करत आहेत.

विद्यापीठानं आत्तापर्यंत जाहीर केलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षा देऊनही, त्यांना गैरहजर दाखवण्यात आलं आहे. तर काहींच्या निकालात भोपळा देण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठात पत्रकारिता विभागात गेल्या वर्षी अव्वल गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शून्य गुण देऊन नापास करण्याचा प्रताप विद्यापीठ प्रशासनानं केला. त्यामुळे विद्यापीठाने याविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

दुसरीकडे निकाल रखडवणाऱ्या मुंबई विद्यापीठाविरोधात एलएलबीच्या तीन विद्यार्थ्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रोजगाराच्या संधी हिरावल्यामुळे 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठाविरोधात तीन विद्यार्थ्यांचा 10 लाखांचा दावा

मुंबई विद्यापीठाच्या निकालात घोळ, पत्रकारितेच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण

पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडला, मुंबई विद्यापीठाचा अजब दावा

ईद-गणेशोत्सवामुळे निकाल रखडला, मुंबई विद्यापीठाचा दावा

मुंबई विद्यापीठ पेपर तपासण्यासाठी सीएंची मदत घेणार

नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विद्यापीठ तेही कारण देईल : आदित्य ठाकरे

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV