मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांना कारणे दाखवा नोटीस

हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे.

By: | Last Updated: 12 Aug 2017 05:52 PM
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरुच आहे. ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आलं आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी निकाल न लागल्याने विद्यार्थी हैराण असताना, आता टीवायबीएससीच्या निकालाचा गोंधळ समोर आला आहे.

निकाल लावण्यासाठी पेपर तपासणीचं काम जलद गतीने सुरु असल्याचं विद्यापीठाकडून सांगितलं जात आहे. मात्र विद्यापीठाने फक्त उत्तरपत्रिकांच्या पुरवणी तपासूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका वगळून केवळ पुरवणी तपासून तेच गुण त्यांना दिल्याची तक्रार अनेक महाविद्यालयांनीच विद्यापीठाकडे केली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना केवळ 15 ते 20 गुण मिळाल्याने त्यांच्या नावापुढे नापास शेरा पडला आहे.

हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे.

तर काही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच तपासल्याचं समोर आलं. निकाल लावण्यासाठी घाईघाईने केलेल्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी कॉलेज प्राचार्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.

कुलगुरुंना कारणे दाखवा नोटीस
दरम्यान, निकालाच्या 15 ऑगस्टच्या तिसऱ्या डेडलाईनला तीन दिवस शिल्लक असताना, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विद्यापीठाचे सगळ्या विषयांचे निकाल मुदतीत जाहीर न केल्याने राज्यपालंनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

एखाद्या कुलगुरुला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची घटना मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. संजय देशमुख हे 150 वर्ष जुन्या मुंबई विद्यापीठाचे 54 वे कुलगुरु आहेत.

अजूनही 154 निकाल बाकी
मुंबई विद्यापीठाचे अजूनही 154 निकाल जाहीर होणं शिल्लक आहे. शुक्रवारी दिवसभरात फक्त 16 निकालच जाहीर झाले होते. 477 पैकी 323 निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाले आहेत. अद्यापही 1 लाख 74 हजार 682 उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे.

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख सक्तीच्या रजेवर

मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या डेडलाईनलाही निकाल नाही : कुलगुरु

मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता

असा भोंगळ कारभार कधीही पाहिला नव्हता: आदित्य ठाकरे

रखडलेले निकाल 5 ऑगस्टला, मुंबई विद्यापीठाची डेडलाईन

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द

मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द

मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता

मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV