मुंबई विद्यापीठातील 28 हजार विद्यार्थांचे निकाल राखीव

मुंबई विद्यापीठानं 477 पैकी 469 विभागाचे निकाल लावले आहेत. तर 17 लाख उत्तरपत्रिकांपैकी 35 हजार उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अजूनही बाकी आहे.

मुंबई विद्यापीठातील 28 हजार विद्यार्थांचे निकाल राखीव

मुंबई : मुंबई विद्यापीठानं निकालासंदर्भात अक्षम्य घोळ घातल्याचं आता प्रभारी कुलगुरुंनीच मान्य केलं आहे. विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे 28 हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ असून त्यांना शून्य मार्क देण्याचा प्रताप मुंबई विद्यापीठानं केला आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे, परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे आणि इतर अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही चूक मान्य केली.

आतापर्यंत मुंबई विद्यापीठानं 477 पैकी 469 विभागाचे निकाल लावले आहेत. तर 17 लाख उत्तरपत्रिकांपैकी 35 हजार उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अजूनही बाकी आहे.

सक्तीच्या रजेवर गेलेले कुलगुरु संजय देशमुख यांनी ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासण्याचा घेतलेला निर्णय विद्यापीठाच्या चांगलाच अंगलट आला आहे.

याआधी सहावेळा मुंबई विद्यापीठाने डेडलाईन पुढे सरकवली आहे. प्रत्येकवेळी काही ना काही कारण देत आपलं हसं करण्यात विद्यापीठ धन्यता मानत आहे. यावेळी 19 सप्टेंबरची डेडलाईन दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या या कारभारामुळे विद्यापीठासह राज्याच्या शिक्षणमंत्र्यांवरही सर्व स्तरातून टीका होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित बातमी :


ईद-गणेशोत्सवामुळे निकाल रखडला, मुंबई विद्यापीठाचा दावा


पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडला, मुंबई विद्यापीठाचा अजब दावा


मुंबई विद्यापीठाविरोधात तीन विद्यार्थ्यांचा 10 लाखांचा दावा


मुंबई विद्यापीठ पेपर तपासण्यासाठी सीएंची मदत घेणार

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV