मुंबई विद्यापीठाचा आणखी एक निकाल घोळ, पुनर्मूल्यांकनात अनेकजण नापास

पुनर्मूल्यांकनाच्या पहिल्या यादीत अनेकांना नापास दाखवण्यात आलं आहे. तर दीड महिन्यानंतर लागलेल्या दुसऱ्या यादीत त्याच मुलांचा निकाल पास दाखवण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाचा आणखी एक निकाल घोळ, पुनर्मूल्यांकनात अनेकजण नापास

मुंबई : मुंबई विद्यापीठात परीक्षेच्या निकालांचा गोंधळ हा नित्याचाच झाला आहे. कारण, पुनर्मुल्यांकनासाठी दिलेल्या निकालात मोठा गोंधळ पाहायला मिळतो आहे. पुनर्मूल्यांकनाच्या पहिल्या यादीत अनेकांना नापास दाखवण्यात आलं आहे. तर दीड महिन्यानंतर लागलेल्या दुसऱ्या यादीत त्याच मुलांचा निकाल पास दाखवण्यात आलं आहे.

विद्यापीठाच्या स्टुडंट लॉ काऊन्सिलच्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला. यानंतर विद्यार्थ्यांनी याचा पाठपुरावा करुन, निकालाचा सर्व डेटा मिळवला. यात अनेक विद्यार्थ्यांबाबत असा प्रकार घडल्याचे समोर आले.

पण, दीड महिन्यानंतर प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत हे विद्यार्थी पास दाखवण्यात आलं आहे. या सगळ्या गोंधळावर लवकरात लवकर तोडगा काढला नाहीतर, अनेक विद्यार्थ्यांना याच फटका बसण्याची शक्यता स्टुडंट लॉ काऊन्सिलने व्यक्त केली आहे.

दरम्यान, विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन 90 दिवस झाले, तरी अद्याप त्या अभ्यासक्रमांचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे निकाल कधीपर्यंत लागणार की, मागच्या वर्षीसारखा गोंधळ यावर्षी देखील पाहायला मिळणार, असा प्रश्न स्टुडंट लॉ काऊन्सिलकडून विचारला जात आहे.

व्हिडीओ पाहा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mumbai unversitys another result issue latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV