मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत भाजपच्या जागृती पाटील या आघाडीवर आहेत.

Mumbai Ward No 116 by election counting live update

मुंबई : मुंबईतील प्रभाग क्र. ११६मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.

काँग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती.  जागृती पाटील या  प्रमिला पाटील यांच्या सून आहेत. मात्र, या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून लढता भाजपचा झेंडा हाती घेतला.

 

या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेनं बराच जोर लावला होता. पण अखेर भाजपनं मोठ्या मताधिक्यानं इथं बाजी मारली. पहिल्या फेरीपासूनच जागृती पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. हिच आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठ्या फरकानं विजय मिळवला.

 

या विजयामुळे मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणातही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

LIVE UPDATE- भाजपच्या जागृती पाटील यांचा दणदणीत विजयी

LIVE UPDATE- पाचवी  फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 9,971 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 5,229 मतं

LIVE UPDATE- चौथी  फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 8234 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 3980 मतं

LIVE UPDATE- तिसरी फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 6333 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 3172मतं

LIVE UPDATE- दुसरी फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 2200 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 1087 मतं
LIVE UPDATE- पहिली फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 1887 मतं, मिनाक्षी पाटील (शिवसेना)- 952 मतं

 

संबंधित बातम्या :

 

मुंबई : वॉर्ड क्र. ११६मध्ये पोटनिवडणूक, सेना-भाजपत चुरशीची लढत

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai Ward No 116 by election counting live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा : हायकोर्ट
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा :...

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे. संपावर गेलेल्या एसटी

एसटी संपावरुन मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे
एसटी संपावरुन मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरु असल्याने मुंबई

दिलदार रतन टाटांचं दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार
दिलदार रतन टाटांचं दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल...

मुंबई : कॅन्सर या दुर्धर रोगावर गरिबातल्या गरिबाला इलाज करता यावा

हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स
हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स

मुंबई: उल्हासनगरात एक अनोखा सत्संग सुरु आहे. ध्वनी प्रदूषण

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या

लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजार  घसरला, सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट
लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजार  घसरला, सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट

मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज कमालीची घसरण पाहायाला मिळाली.

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!
लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!

मुंबई : फेसबुक पेज सुरु केल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी

प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक
प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक

मुंबई: संप मिटविण्याऐवजी एसटी प्रशासन संप चिघळवत आहे, असा गंभीर

महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!
महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर