जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे मुंबईत काही ठिकाणी पाणीकपात

माहिम भूमिगत बोगद्याजवळ एक हजार 200 मिमी. व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे.

जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे मुंबईत काही ठिकाणी पाणीकपात

मुंबई : मुंबईत माहिम भागात भूमिगत बोगद्याच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे कुलाबा ते सायन, माहिम आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये आज (गुरुवारी) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

माहिम भूमिगत बोगद्याजवळ एक हजार 200 मिमी. व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत (12 तास) हे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे कुलाबा ते सायन, माहिम आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

भूमिगत बोगद्याच्या या कामासाठी मरोळ-मरोशी पासून माहिम-रुपारेल ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा बारा तासांसाठी बंद करावा लागणार आहे.

कोणत्या भागांना पाणीपुरवठा होणार नाही -

ए विभाग - नरिमन पॉइंट, बॅकबे, कफ परेड, कुलाबा, नेव्हीनगर, नेवी, बोरीबंदर / साबुसिद्दीक क्षेत्र, रेल्वे झोन

सी विभाग - बॅकबे क्षेत्र (नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, ई आणि एस रोड)

डी विभाग - लिटिल गिब्ज रोड, रिज रोड, पेडर रोड, भुलाभाई देसाई रोड, वाळकेश्वर रोड, नेपियन्सी रोड, कारमेकल,अल्टामाउंट रोड, ताडदेव रोड आणि एम पी मिल क्षेत्र

ई विभाग - बाई य. ल. नायर आणि कस्तुरबा रुग्णालय

जी उत्तर - सिटी सप्लाय क्षेत्र (एस.एल. रहेजा रोड, मोदी रोड, एल.जे. रोड, एस.व्ही.एस. रोड, टी. एच. कटारीया रोड, बाळ गोविंददास रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, एन. सी. केळकर, रोड, एस. के. बोले रोड, भवानी शंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग)

जी/दक्षिण विभाग - (पूर्णत:) सिटी सप्लाय क्षेत्र (बी.डी.डी. चाळ, एन.एम.जोशी मार्ग येथे, ए.बी. रोड, सेनापती बापट रोड,
एस.व्ही.एस. रोड, गणपतराव कदम, मार्ग, पांडुरंग बुधकर रोड, वरळी कोळीवाडा), सखुबाई मोहिते मार्ग, बुद्ध टेम्पल, अहुजा
सप्लाय आणि 900 मिमी. व्यासाचा वरळी टेकडी, जलाशय आउटलेट क्षेत्र (वरळी बी.डी.डी. चाळ)

एच/पश्चिम विभाग - जनरल क्षेत्र, वांद्रे रिक्लमेशन, पेरी रोड, चॅपल रोड, बी. जे. रोड, खारदांडा, दिलीप कुमार क्षेत्र, कोलडोंगरी,
झिकझॅक रोड, पाली माला रोड, बाजार रोड आणि युनियन पार्क क्षेत्र

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Water cut in Mumbai due to repairing work of water tunnel in Mahim latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV