मुंबई लोकल : ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे उशिराने!

अंधेरी ते जोगेश्वरीच्या दरम्यान रात्री ब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी तो क्लिअर झाला आहे.

मुंबई लोकल : ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे उशिराने!


मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील सर्व ट्रेन उशिराने सुरु आहेत. रात्री घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आणि त्यामुळे सर्वच ट्रेन उशिराने धावत आहेत.

अंधेरी ते जोगेश्वरीच्या दरम्यान रात्री ब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी तो क्लिअर झाला आहे. मात्र, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर या ब्लॉकचा परिणाम झाला आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे.

आज गुरुवार म्हणजेच चालू दिवस आहे. त्यामुळे ट्रेनला आधीच मोठी गर्दी असते. त्यात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक उशिराने सुरु आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mumbai : western railway late due to block latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV