स्तनपान करताना विजेचा शॉक, मुंबईत मायलेकाचा मृत्यू

प्रिन्सला स्तनपान करण्यासाठी प्रियंका खिडकीत बसली. दिवाळीच्या माळांची एक लाईव्ह वायर ग्रीलच्या संपर्कात आल्यामुळे मायलेकाला विजेचा मोठा झटका बसला.

स्तनपान करताना विजेचा शॉक, मुंबईत मायलेकाचा मृत्यू

मुंबई : स्तनपानासाठी खिडकीत बसलं असताना विजेचा धक्का बसून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. 26 वर्षीय प्रियंका भारतीसह तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला.

मुंबईत गोरेगावमधल्या बिंबिसार नगरमधल्या म्हाडाच्या वसाहतीत प्रियंका भारती पती, सहा वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा प्रिन्ससोबत राहत होती.

शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ती प्रिन्सला स्तनपान करण्यासाठी खिडकीत बसली. लोखंडी ग्रीलला तिचा हात लागला. मात्र दिवाळीच्या माळांची एक लाईव्ह वायर ग्रीलच्या संपर्कात आल्यामुळे मायलेकाला विजेचा मोठा झटका बसला. हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

आईला शॉक लागल्याचं पाहून मोठ्या मुलीने आरडाओरड करायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. प्रियंका आणि प्रिन्सला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

दरम्यान, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या दुर्दैवी घटनेसाठी कोणालाही जबाबदार ठरवता येणार नाही, असं सांगितलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV