मुंबईत उबर टॅक्सी चालकाकडून तरुणीची छेडछाड

"गाडीत बसल्यापासून आरोपी चालक जितेंद्र माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. खासगी माहिती विचारत होता, असं तक्रारदार तरुणीने सांगितलं.

मुंबईत उबर टॅक्सी चालकाकडून तरुणीची छेडछाड

मुंबई : उबर टॅक्सी चालकाने छेडछाड केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. जितेंद्र असं या उबर टॅक्सी चालकाचं नाव असून तो पसार झाला आहे.

ह्या तरुणीने बुधवारी रात्री दक्षिण मुंबईहून अंधेरीकडे जाण्यासाठी उबर टॅक्सी बुक केली होती. "गाडीत बसल्यापासून आरोपी चालक जितेंद्र माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. खासगी माहिती विचारत होता, असं तक्रारदार तरुणीने सांगितलं.

"वांद्रे-वरळी सी लिंक संपल्यानंतर रेक्लमेशनजवळ चालक गाडीतून उतरला आणि मागच्या सीटवर येऊन बसला. त्यानंतर त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसंच अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केला," असं तरुणी म्हणाली.

अखेर तरुणी टॅक्सीतून उतरुन मागे टोलनाक्याच्या दिशेने चालत आली. तेवढ्यात चालकाने तिथून पोबारा केला. तरुणी आणि तिच्या भावाने गुरुवारी संध्याकाळी या प्रकरणी वांद्रे पोलिसात तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV