महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार

मुंबई : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळण्यासाठी सुरु असलेल्या महिलांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आलं आहे. महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही, असं आश्वासन राज्य सरकारने दिलं.

महिलांसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावल्याने लातूरमधील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या छाया काकडे यांच्या नेतृत्वात मागील सहा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरु होतं.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली. महिला बचत गटाच्या सॅनिटर नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं.

तसंच शाळा आणि रेशन दुकानांवरही सॅनिटरी नॅपकीन मिळणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

महिलांच्या प्रमुख मागण्या
सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळणे
कॅन्सरग्रस्त महिलांना सॅनिटर नॅपकिन आणि आरोग्याच्या सुविधा मोफत देणे
माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात सॅनिटर नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशिन बसवणं बंधनकारक
पर्यावरणपुरक सॅनिटरी नॅपकिन युनिट बचत गटांना चालवण्यास देण आणि स्वयंरोजगार मिळवून देणं
रेशनिंगवर न्यापकिन उपलब्ध करुन देणे

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV