दादर स्टेशनवर महिलेची प्रसुती, बाळ-बाळंतीण सुखरुप

सलमा शेख असं या महिलेचं नाव आहे. आई आणि बाळ सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

दादर स्टेशनवर महिलेची प्रसुती, बाळ-बाळंतीण सुखरुप

मुंबई : रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर महिलेची प्रसुती झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. दादर स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता महिलेने मुलीला जन्म दिला.

सलमा शेख असं या महिलेचं नाव आहे. दादर स्टेशनवर असेलल्या वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर प्रज्वलित आणि महिला जीआरपी यांच्या मदतीने सलमा यांची प्रसुती करण्यात आली.

रेल्वे स्टेशनवरच सलमा यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यानंतर इतर प्रवाशांनी मदतीसाठी जीआरपी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आई आणि बाळ सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसुती होण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी घाटकोपर स्टेशनवरही महिलेने बाळाला जन्म दिला होता, असं वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV