ऑनलाईन गेममधून मुंबईकर तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर

ब्रेव्ह अँड डेअर' गेम खेळत या मुलीने आपले अश्लील फोटो तरुणासोबत शेअर केले.

ऑनलाईन गेममधून मुंबईकर तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर

मुंबई : मुंबईत 16 वर्षीय तरुणीला 'ब्रेव्ह अँड डेअर' गेमच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील फोटो सोशल साईटवर अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकरणी गुजरातमधील एका 23 वर्षीय तरुणाला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

अंधेरीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधील तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर 'ब्रेव्ह अँड डेअर' गेम खेळत या मुलीने आपले अश्लील फोटो तरुणासोबत शेअर केले. मात्र या तरुणाने मुलीचे फोटो सोशल साईटवर पोस्ट केले.

ही बाब समजताच मुलीच्या वडिलांनी अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासानंतर पोलिसांनी तरुणाला गुजरातमधून अटक केली. दरम्यान हा प्रकार 'ब्रेव्ह अँड डेअर' गेममुळेच झाला का? याच तपास पोलीस करत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Youth posts vulgar photos of minor girl on social media latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV