राज ठाकरेंसोबत प्रामाणिक : मनसे नगरसेवक संजय तुर्डे

शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला काल रात्री बोलवून शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, असं तुर्डेंनी सांगितलं

राज ठाकरेंसोबत प्रामाणिक : मनसे नगरसेवक संजय तुर्डे

मुंबई : मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडणाऱ्या एकमेव नगरसेवकाने आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. संजय तुर्डे यांनी सेनाप्रवेशाच्या ऑफरबाबत माहिती दिली आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला काल रात्री बोलवून शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितलं, असं संजय तुर्डे म्हणाले. मात्र मी राजसाहेब ठाकरेंसोबत प्रामाणिक आहे, असं तुर्डेंनी स्पष्ट केलं.

गेल्या एका महिन्यापासून हे प्रकार सुरु असल्याचा दावा तुर्डेंनी केला आहे. दिलीप लांडेंनी महिनाभरापूर्वी यासंदर्भातली चाचपणी केली होती, असंही ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.

कोण आहेत संजय तुर्डे?

संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे आपल्या कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करत होते. परंतु याचवेळी संजय तुर्डे आणि  20 ते 25 कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. ज्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप संजय तुर्डे यांनी केला होता.

संबंधित बातम्या :


घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे


पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब


7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक


पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!


शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत


मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?


मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!


करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप


दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले


‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान


मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार


भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?


मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी


करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप


शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!


फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV