मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप नंबर वन

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 23 February 2017 3:32 PM
मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप नंबर वन

मुंबई: मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील 10 महापालिकांपैकी 8 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. भाजपने मुंबई आणि ठाणे सोडून नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आदी महापालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.

मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ 31च नगरसेवक होते. पण शिवसेनेने युती तोडल्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. सध्या भाजपचे 77 जागांवर आघाडी मिळवली आहे.

मुंबईजवळच्याच उल्हासनगर महापालिकेत भाजपची सरशी झाली आहे. या निवडणुकीत भाजपने पप्पू कलानी यांच्यासोबत आघाडी केल्याने, भाजपवर चहूबाजूंनी टीका होत होती. पण इथे भाजपची सरशी होऊन भाजप आघाडीला 33 जागांवर विजयी आघाडी मिळाला आहे.

तर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या नाशिक महापालिकेत भाजपने राज ठाकरेंच्या मनसेकडून सत्ता अक्षरश: हिसकावून घेतली आहे. गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत मनसेचे 40 तर भाजपचे केवळ 14 नगरसेवक होते. पण यंदा भाजपने 40 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. तर मनसेच्या इंजिनाला मोठा ब्रेक लागला आहे. मनसेच्या सध्या तीनच उमेदवारांनी आघाडी मिळवली आहे.

भाजपने सर्वाधिक मुसंडी ही पुणे महापालिकेत मारल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये भाजपचे फक्त 26 च नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने 77 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. पुण्यात सध्या भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भाजपचे गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ 3 नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने सध्या 31 जागांवर आघाडी मिळवली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर महापालिकेतही भाजपने काँग्रेसचा दणकून पराभव केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण या निवडणुकीत भाजपने 28 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत.

तिकडे विदर्भातही भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण भाजपनं आपलं पुन्हा एकदा नागपूर महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत 62 जागांवर विजय मिळवला होता. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने 48 जागांवर आघाडी मिळवली आहे.

यासोबतच अमरावती महापालिकेवरही भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. सध्या भाजपने 30 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. तसेच अकोला महापालिकेतही भाजपला यश मिळालं आहे. भाजपने 36 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे.

First Published: Thursday, 23 February 2017 3:32 PM

Related Stories

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

नवी दिल्ली : जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.

सोलापुरात चार एकर शेती, 6 महिन्यात 40 लाखाची मिरची
सोलापुरात चार एकर शेती, 6 महिन्यात 40 लाखाची मिरची

सोलापूर : शेतीत राम नाही, असं सांगत गावाकडून शहरात नोकरीसाठी आलेली

कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलींची वेश्या व्यवसायासाठी तस्करी
कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलींची वेश्या व्यवसायासाठी तस्करी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची

नांदेडमधील दोन महिलांचं धैर्य, चोरट्यांना पिटाळून लावलं !
नांदेडमधील दोन महिलांचं धैर्य, चोरट्यांना पिटाळून लावलं !

नांदेड : घरात चोर शिरले, तर भल्या-भल्यांची बोलती बंद होते. मात्र

साईबाबा संस्थानाचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात
साईबाबा संस्थानाचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना...

शिर्डी : शिर्डी साईबाबा संस्थान राज्यातील आत्महत्याग्रस्त

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/03/2017

  उन्हाच्या चटक्यांनी लोकांची काहिली, विदर्भात पारा 40 अंशाच्या

सोमवती यात्रेनिमित्त 'जय मल्हार'चा गजर, सोन्याची जेजुरी दुमदुमली
सोमवती यात्रेनिमित्त 'जय मल्हार'चा गजर, सोन्याची जेजुरी दुमदुमली

इंदापूर : महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या सोमवती

27 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, पतीसह सासू-सासरे ताब्यात
27 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, पतीसह सासू-सासरे ताब्यात

लातूर : लातूरमध्ये 27 वर्षीय विवाहितेचा मृतदेह राहत्या घरी

राज्यात उन्हाने काहिली, मात्र हिट वेव्ह नाही : पुणे वेधशाळा
राज्यात उन्हाने काहिली, मात्र हिट वेव्ह नाही : पुणे वेधशाळा

पुणे : अजून चैत्र महिना सुरु झाला नसला तरी राज्यात वैशाख वणवा

पालिकेच्या नावे दिशाभूल, औरंगाबादेत 8 बोगस महिला डॉक्टर अटकेत
पालिकेच्या नावे दिशाभूल, औरंगाबादेत 8 बोगस महिला डॉक्टर अटकेत

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये 8 बोगस महिला डॉक्टरांना महापालिकेच्या