भिवंडीत प्रेमप्रकरणाच्या रागातून 21 वर्षीय तरुणाची हत्या

भिवंडीत प्रेमप्रकरणाच्या रागातून 21 वर्षीय तरुणाची हत्या

भिवंडी : भिवंडीत प्रेमप्रकरणाच्या रागातून एका 21 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे, प्रेम म्हात्रे असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंजूर गावातल्याच एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. प्रेयसीच्या दोन भावांनी चाकूनं वार करत प्रेमची हत्या केली आहे.

अंजूर गावात राहणाऱ्या प्रेमचे गावतल्याच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या मुलीचे भाऊ निलेश म्हात्रे आणि मंदार तरे यांचा या प्रेमाला विरोध होता. अनेकदा समजावूनही प्रेम ऐकत नसल्यानं अखेर मंगळवारी रात्री या दोघांनी प्रेमला भिवंडीच्या दापोडा भागातील सिद्धीनाथ कॉम्प्लेक्समध्ये बोलावलं आणि चाकूने त्याच्यावर वार केले.

यात प्रेमचा जागीच मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या मंदारने स्वतःहून नारपोली पोलिसांपुढे शरणागती पत्करली, तर निलेशला पोलिसांनी त्याच्या घरून अटक केली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV