मुंबई स्फोट : तिघांना जन्मठेप, चौघांना 10 वर्षांची जेल

मुंबई स्फोट : तिघांना जन्मठेप, चौघांना 10 वर्षांची जेल

मुंबई : मुंबईत 2002 आणि 2003 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणातील मास्टरमाईंड मुझम्मिल अन्सारी, याच्यासह फरहान खोत आणि वाहीद अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

तब्बल 13 वर्षानंतर टाडा न्यायालयानं या खटल्यात 13 पैकी 10 आरोपींना आज शिक्षा सुनावली.  त्यातल्या चार दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर तिघांना दोन वर्षांची कारावास ठोठावण्यात आला.

 

डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या चार महिन्यात मुंबईत तीन वेळा बॉम्बस्फोट झाले होते.  या स्फोटांमागे 'स्टुंड्टस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया' अर्थात 'सिमी' या दहशतवादी संघटनेचा हात होता.

 

डिसेंबर 2002 आणि मार्च 2003 दरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट घडविल्याचे तपासात समोर आले होते.  6 डिसेंबर 2002 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ मॅक्डोनाल्डमध्ये, 27 जानेवारी 2003 रोजी पार्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये तर 13 मार्च 2003 रोजी मुलुंड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 17 जण जखमी झाले होते.

 

कोणाला किती शिक्षा  

मरेपर्यंत जन्मठेप

1)  फरहान मलीक खोत - एकूण पाच गुन्हे सिद्ध झालेत यात पोटा, अवैध हत्यारे बाळगणे आणि एक्सप्लोसिव्ह एक्ट मधील दोन कलमांतर्गत दोषी ठरवलं - जन्मठेप शिक्षा

 

2)  वाहिद अंसारी - एकूण पाच गुन्हे सिद्ध झालेत यात पोटा, अवैध हत्यारे बाळगणे आणि एक्सप्लोसिव्ह एक्ट मधील दोन कलमांतर्गत दोषी ठरवलं - जन्मठेप शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड  

 

3) मुज्जमील अंसारी - याला एकूण १८ आरोपीत दोषी ठरवण्यात आलं. पोटा, अवैध हत्यारे बाळगणे, एक्सप्लोसिव्ह एक्ट, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, रेल्वे एक्ट, भारतीय दंड संहिता -- 1 लाख रुपये दंड आणि मरेपर्यंत जन्मठेप

 

10 वर्षे शिक्षा

 

4) साकीब नाचण - पोटा, अवैध हत्यार बाळगणे या कलमांतर्गत  दोषी - 10 वर्षे सक्त मजुरी आणि एक लाख दंड

5) अतीक मुल्ला - पोटा, अवैध हत्यार बाळगणे या कलमांतर्गत   दोषी - 10 वर्षे सक्त मजुरी, एक लाख दंड

 

6) नसीर मुल्ला - पोटा, अवैध हत्यार बाळगणे या कलमांतर्गत  दोषी - 10 वर्षे सक्त मजुरी, एक लाख दंड

 

7) गुलाम अकबर कोट्ल - पोटा, अवैध हत्यारे बाळगणे आणि एक्सप्लोसिव्ह एक्ट मधील दोन कलमांतर्गत दोषी - 10 वर्षे कारावास आणि १ लाख दंड

 

दोन वर्षांची शिक्षा

 

8) मोहम्मद कामिल जमील शेख - अवैध हत्यारे बाळगणे या कलमाखाली  दोषी - 2 वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार दंड

 

9) नूर मोहम्मद - अवैध हत्यारे बाळगणे या कलमाखाली  दोषी - 2 वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार दंड

 

10) अन्वर अली - अवैध हत्यारे बाळगणे या कलमाखाली  दोषी - 2 वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार दंड

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV