एकाच कुटुंबातील चौघांचं विषप्राशन, बापलेकीचा मृत्यू

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये 30 वर्षीय मनिष सिंग कुटुंबासह राहतो. मनिषवर बँकेचं कर्ज असल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

एकाच कुटुंबातील चौघांचं विषप्राशन, बापलेकीचा मृत्यू

नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपारात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये बापलेकीचा मृत्यू झाला असून आई आणि दुसरी मुलगी बचावल्या आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये 30 वर्षीय मनिष सिंग कुटुंबासह राहतो. मनिषवर बँकेचं कर्ज असल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रविवारी रात्री मनिषसह संपूर्ण कुटुंबाने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनिषसह सात वर्षांच्या प्रगतीचा मृत्यू झाला. तर तीन वर्षांची प्रतीक्षा आणि पत्नी पिंकी बचावल्या आहेत.

मायलेकींना वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री या कुटुंबाने विषप्राशन केलं होतं. सकाळी नातेवाइकांमुळे ही घटना उघड झाली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV