माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या : राणे

'मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.'

माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या : राणे

मुंबई : 'माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.' अशा शब्दात  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिलं आहे.

राणेंना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, अद्यापही राणे मंत्रीपदापासून दूरच आहेत. त्यामुळे याचविषयी बोलताना आज (शुक्रवार) राणे उद्विग्न झाल्याचे पाहायला मिळालं.

आज नारायण राणेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मंत्रीपदाबाबत प्रश्नही विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना राणे म्हणाले की, 'मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.' असं राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, आता राणेंच्या या पवित्र्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO :संबंधित बातम्या :

कोकण भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narayan Rane answer on his cabinet minister latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV