राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्यास उत्सुक नाही : सूत्र

वांद्रेच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढवण्यास नारायण राणे इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.

राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्यास उत्सुक नाही : सूत्र

मुंबई : नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. पण वांद्रेच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढवण्यास नारायण राणे इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.

यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची भेट होणार आहे. त्यानंतरच याबाबत नेमका निर्णय घेतला जाणार आहे.

राणेंना रोखण्यासाठी शिवसेना सुरुवातीपासूनच आक्रमक आहे. भाजपचं संख्याबळ अपुरं असल्यामुळे शिवसेना राणेंना दगाफटका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राणे पुन्हा एकदा धोका पत्करणार नसल्याचं समजतं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजूनही चित्र स्पष्ट होत नसताना नारायण राणे यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. मात्र यात राणेंना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राणेंविरोधात एकच उमेदवार देऊन त्याला इतर पक्षांनी पाठिंबा देण्याची रणनीती सुरु असल्याची चर्चा आहे.

भाजपने राणेंना पाठिंबा दिल्यास ते अपक्षांना सोबत घेऊ शकतात. तर तिकडे, विरोधकांनी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला शिवसेनेने मोट बांधली, तर त्यांचं संख्याबळ 146 वर जाईल. तसं झाल्यास विरोधकांचा उमेदवार विधानपरिषदेच्या आमदारपदी येईल.

विधानसभेतील पक्षीय बलाबल :

  • भाजप 122

  • काँग्रेस– 42

  • राष्ट्रवादी 41

  • शिवसेना 63

  • इतर 13

  • अपक्ष 7


मतदान कार्यक्रम

अधिसूचना जारी करण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2017
नामनिर्देशनाची अंतिम मुदत – 27 नोव्हेंबर 2017
अर्जांची छाननी – 28 नोव्हेंबर 2017
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – 30 नोव्हेंबर 2017
मतदान – 7 डिसेंबर 2017 – सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
मतमोजणी – 7 डिसेंबर 2017 – संध्याकाळी 5 वाजता

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narayan Rane is not keen on contesting the vidhan parishad by poll elections latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV