तिकीट मिळालं असतं तर मीच जिंकलो असतो : राणे

भाजपचा निर्णय मान्य असल्याची कबुली नारायण राणे यांनी दिली आहे

तिकीट मिळालं असतं तर मीच जिंकलो असतो : राणे

मुंबई : शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर भाजपने नारायण राणेंचा पत्ता कट केला आणि प्रसाद लाड यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली. माझ्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येणं हाच विजय असल्याचं नारायण राणे म्हणाले.

भाजपकडून मला संधी मिळाली असती तर शिवसेनेची मतं फुटली असती. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतरही विधानपरिषदेची पोटनिवडणूक मी जिंकलो असतो असा विश्वास राणेंनी बोलून दाखवला. भाजपचा निर्णय मान्य असल्याचंही राणे म्हणाले.

दुसरीकडे, भाजपने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधूनच नाराजीचे  सूर उमटत आहेत.

निष्ठावंत माधव भांडारींऐवजी 'लाड' यांना उमेदवारीचा 'प्रसाद' का?


नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे.

संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!


या जागेसाठी भाजपकडून पक्षनिष्ठ आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती. माधव भांडारी हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेतच, शिवाय पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण आणि ठोसपणे मांडण्याची मुख्य जबाबदारी ते नेटाने बजावतात.

विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी


असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याने, प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narayan Rane reacts on Vidhan Parishad MLC ticket latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV