बाळसाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नाही : राणे

‘बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा त्रास कोणत्याच मुलानं आपला बापाला दिला नसेल.’ असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे.

बाळसाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नाही : राणे

डोंबिवली : ‘बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा त्रास कोणत्याच मुलानं आपला बापाला दिला नसेल.’ असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे. डोंबिवलीमध्ये आज (गुरुवार) त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते.

 नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
‘उद्धव ठाकरेंमुळे मी 2005 साली शिवसेनेतून बाहेर पडलो. मी साहेबांना त्रास दिला नाही. साहेबांना मी सांगून बाहेर पडलो. आज मी उघडपणे तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा कोणत्याच मुलानं आपल्या बापाला दिला नसेल. मी याला साक्षीदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत.’ असं राणे यावेळी म्हणाले.

 

दरम्यान, यावेळी बोलताना राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर तुफान टीका केली.  ‘मी भाजपमध्ये जाऊ नये, मंत्री होऊ नये याबाबत उद्धव ठाकरे रोज मुख्यमंत्र्यांना सांगतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी असा रडीचा डाव आता तरी खेळू नये.’ असा नारायण राणे यावेळी म्हणाले.

आता राणेंच्या या गंभीर आरोपांना शिवसेना नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, 1 तारखेला दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे पुढची दिशा स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता राणे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO : संबंधित बातम्या :

नारायण राणेंचा नवा पक्ष लवकरच, एनडीएत सहभागी होणार?

नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार!

राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?

हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे

राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे


माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे


माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे


मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर : नितेश राणे


 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV