नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होणारच : सूत्र

काँग्रेस आमदार आणि राणेंचं पुत्र नितेश राणेंनी आज ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होणारच : सूत्र

 

मुंबई : शिवसेनेच्या विरोधानंतरही नारायण राणेंचा एनडीए प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. नारायण राणेंच्या एनडीए प्रवेशासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरु असल्याचं दिसतं आहे.

काँग्रेस आमदार आणि राणेंचं पुत्र नितेश राणेंनी आज ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

शिवसेना मात्र राणेंना एनडीएमध्ये न घेण्यावर ठाम असल्याची माहिती मिळती आहे. मात्र, मुख्यमंत्री राणेंना सामावून घेण्यावर ठाम आहेत.

CM and Nitesh Rane-

दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी याविरोधात राणे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं  आहे अशांना मंत्रिमंडळात कसं घेता? असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपला केला आहे.

‘राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल’, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची बातमी काल आली होती. मात्र तरीही भाजप राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशावर ठाम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नेमकं काय होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा कोटा आहे. भाजपच्या कोट्यातून नारायण राणेंना मंत्रिमंडळावर घेतलं जाणार असल्याने शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न उरणार नसल्याचं म्हटलं जातं. शिवाय, नारायण राणेंना शिवसेनेचा विरोध जुनाच आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि ते एनडीएत दाखल झाले.

संंबंधित बातम्या :

ईडीनं आरोपपत्र दाखल केलेले राणे मंत्रिमंडळात का? : शिवसेना

सत्ता भाजपच्या मालकीची, आम्ही नावापुरते : संजय राऊत

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narayan Rane will be included in the Cabinet source latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV