नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार!

नारायण राणे 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची वाटचाल स्पष्ट करणार आहेत.

नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार!

मुंबई : भाजप नेत्यांना भेटल्यानंतरही अधांतरी असलेल्या नारायण राणेंचं काय होणार? याचं उत्तर एक ऑक्टोबरला मिळणार आहे. कारण नारायण राणे 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची वाटचाल स्पष्ट करणार आहेत.

दसऱ्यापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करु असं राणेंनी कुडाळमधील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण या भेटीत राणेंच्या भाजप प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता आगामी पत्रकार परिषदेत राणे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपच्या थंड प्रतिसादामुळे राणेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. अमित शाहांच्या बैठकीत राणेंच्या राजकीय अटी-अपेक्षांबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता राणे भाजपमध्ये जाणार की स्वत:चा पक्ष काढणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

संंबंधित बातम्या :

राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?

हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे

राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे


माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे


माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे


मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर : नितेश राणे


मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV