पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरेंशिवाय मोदींनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकरचंही कौतुक केलं.

आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी आज सकाळीच, स्वत: झाडू हाती घेऊन मुंबईत स्वच्छता केली.

मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केलं.

आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी स्वत: ट्विट करुनही, स्वच्छतेचे संदेश दिले होते.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या दोघांचं कौतुक केलं.

मोदी म्हणाले, “माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन, मुंबईत साफसफाई केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो”

https://twitter.com/narendramodi/status/912553793677430784

याशिवाय सचिनबद्दल मोदी म्हणाले, “सचिनने स्वच्छ भारत अभियानात घेतलेला सहभाग कायम असून, तो कौतुकास्पद आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे  देशभरातील लोक प्रेरणा घेतील.

https://twitter.com/narendramodi/status/912553668850810881

तिसऱ्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात, “स्वच्छता ही सेवा या अभियानात अर्जुन तेंडुलकरसारख्या युवकांचा प्रतिसाद वाढतोय हे निश्चितच आनंददायी आहे. आपली युवाशक्ती स्वच्छ भारत नक्की बनवेल”

https://twitter.com/narendramodi/status/912551653617700864

संबंधित बातम्या

सचिनच्या हाती झाडू, अर्जुन तेंडुलकरसह वांद्रे परिसरात स्वच्छता

अर्जुन तेंडुलकरची वांद्रे परिसरात साफसफाई

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV