CCTV: माणुसकी दाखवा, मदत करा, कोणावरही अशी वेळ येऊ शकते!

नवी मुंबईच्या खारघर सेक्टरमध्ये शनिवारी घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

CCTV: माणुसकी दाखवा, मदत करा, कोणावरही अशी वेळ येऊ शकते!

नवी मुंबई: खारघरमध्ये अंसवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला.

नवी मुंबईच्या खारघर सेक्टरमध्ये शनिवारी घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या दृश्यानं फक्त अपघातच नव्हे तर नवी मुंबईतल्या रस्त्याच्या दुरवस्थेचं वास्तव समोर आणलंय.

खारघर सेक्टर 12 मध्ये राहणारी शिल्पा पुरी दुचाकीवरून जात होती. खड्ड्यामुळं तीचा तोल गेला आणि ती खाली पडली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या क्रेननं तिला चिरडलं.

या भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर 10 ते 15 वाहनं इथून गेली. पण एकानंही या मुलीच्या जवळ जाण्याचा किंवा तिला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही.

उद्या ही वेळा कुणावरही येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला असा अपघात झाल्याचं दिसल्यास तातडीनं मदत करा.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV