नवी मुंबईत सिडकोने कामोठ्यातील अतिक्रमण हटवलं

नवी मुंबईतील वाशी स्टेशनबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी कालच फेरीवाल्यांना हटवलं होतं. त्यानंतर सिडको प्रशासाने कामोठ्यात स्वतःहून कारवाई केली.

नवी मुंबईत सिडकोने कामोठ्यातील अतिक्रमण हटवलं

नवी मुंबई : कामोठे येथील सिडकोच्या मोकळ्या असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यात आलं. साठ ते सत्तर फेरीवाल्यांविरोधात सिडकोने कारवाई केली. सर्व टपऱ्या आणि स्टॉल्स जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकण्यात आले.

फेरीवाल्यांविरोधात मुंबईत आंदोलन सुरु असताना नवी मुंबईत सिडकोने सतर्क होत अगोदरच कारवाई केली आहे. नवी मुंबईतील वाशी स्टेशनबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी कालच फेरीवाल्यांना हटवलं होतं. त्यानंतर सिडको प्रशासाने कामोठ्यात स्वतःहून कारवाई केली.

कामोठ्यातील सेक्टर 34 मधील सिडकोच्या रिकाम्या भूखंडावर अतिक्रमणं वसले होते. एक प्रकारची बाजारपेठ या ठिकाणी तयार होत होती. मात्र सिडकोने सर्व फेरीवाल्यांना हटवलं आहे.

मुंबईत सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनसेने मुंबईतील विविध स्टेशनांबाहेर फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाची सुरुवात नवी मुंबईतही झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वतःहून फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

संबंधित बातमी : नवी मुंबईत मनसेचा राडा, वाशी स्टेशनबाहेरील फेरीवाले हटवले

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Navi Mumbai cidco takes action against illegal hawkers
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV